खेड : आयशर ट्रकला झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

banner 468x60

आयशर ट्रकला झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना खेड-मंडणगड मार्गावर धामणी येथे आज (मंगळवारी २५ जुलै रोजी) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. रोहित राजेंद्र बिरवटकर ( २१, रा. पोयनार आलाटीवाडी, ता. खेड ) असे जागीच मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक नंबर एमएच ०४ केएफ ९८६५ हा मंडणगडहुन सिमेंट उतरवून खेडच्या दिशेने भरधाव वेगाने येत होता.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909


याच दरम्यान खेडहून दुचाकीस्वार रोहित बिरवटकर हा आपले वडील राजेंद्र बिरवटकर यांना घेऊन खेडवरून पालगडच्या दिशेने जात होता. धामणी येथे आल्यावर गाडीच्या वेगावर नियंत्रण न राहील्याने रोहितच्या ताब्यातील बाईकने ट्रकच्या उजव्या बाजूला धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की रोहितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचे जागीच निधन झाले तर मागे बसलेले त्याचे वडील राजेंद्र बिरवटकर यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.मयत रोहित याचे शवविच्छेदनासाठी कळबनी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

शवविच्छेदनानतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताचा अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *