ओळखीचा गैरफायदा घेत दोन मित्रांसह एकाने तरुणीला दारू (Alcohol) पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. ही घटना १५ ते १६ तारखेदरम्यान तालुक्यातील एका गावातील माळरानावर घडली.या प्रकरणी कणकवली पोलिसांनी (Kankavli Police) बाळकृष्ण ऊर्फ बाळू सदानंद तांबे (वय २६, रा. नाद, बौद्धवाडी), शैलेश शांताराम तांबे (३४, रा. दारूम) आणि गणेश प्रकाश गुरव (२४, रा. शिरवली, देवगड) या तिघांना अटक केली आहे.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
पीडित युवतीशी संशयित बाळकृष्ण याची ऑगस्ट २०२२ मध्ये ओळख झाली. पुढे ही ओळख घट्ट झाली. यातूनच १४ तारखेला पीडित युवती दुपारी एकच्या सुमारास तालुक्यातील एका गावात बाळकृष्ण याला भेटायला आली. दुपारी दोन वाजता ते दोघेही एस. टी. बसने देवगड येथे फिरण्यासाठी गेले. सायंकाळी सात वाजता ते परतले.
यानंतर बाळकृष्ण याने आपल्या जवळच्या नातेवाईकाला फोन केला. यात आपल्याला मैत्रिणीसह राहायची सोय हवी आहे. तिला घरी आणू का, अशी विचारणा केली.
त्यावेळी त्या नातेवाईकाने तुम्हा दोघांची राहण्याची व्यवस्था इथे होणार नाही. इथे मुक्कामासाठी येऊ नका, असे स्पष्ट केले. त्यानंतर बाळकृष्ण याने आपल्या दुकान मालकाला फोन केला. आपल्या मैत्रिणीची एस.टी. चुकली आहे.
त्यामुळे मुक्काम करण्यासाठी रूम मिळेल का, अशी विचारणा केली. त्यावेळी मालकाने आपल्याकडे रूम नाही; पण दुकानामध्ये जी केबिन आहे, तिथे व्यवस्था होते का पाहा, असे सांगितले. त्यानंतर १४ ऑक्टोबरच्या रात्री पीडित युवती आणि बाळकृष्ण यांनी त्या केबिनमध्ये मुक्काम केला.
१५ ऑक्टोबरला दुपारी बारापर्यंत तेथे वास्तव्य केल्यानंतर पीडित युवती आणि बाळकृष्ण आपल्या नातेवाईकांकडे गेले. त्यावेळी बाळकृष्ण याने त्या नातेवाईकाकडे पैशाची मागणी केली; मात्र त्यांनी आत्ता आपल्याकडे पैसे नाहीत, नंतर बघू या, मात्र आता तुम्ही आपल्या घरी जा, असे सांगून त्यांना पाठवून दिले.
सायंकाळी बाळकृष्ण हा युवतीला घेऊन पुन्हा त्या मूळ गावी आला. त्या युवतीला एका चायनीज सेंटरमध्ये बसवून तो काही वेळाने येतो, असे सांगून निघून गेला. बराच वेळ झाला तरी बाळकृष्ण न आल्याने युवतीने बसस्थानक गाठले. सायंकाळी तिने बाळकृष्ण याला फोन केला.
त्या वेळी बाळकृष्ण याने आपण एका वाईन शॉपमध्ये दारू पीत असल्याचे सांगितले. त्या युवतीने शोधाशोध करून वाईन शॉप गाठले आणि बाळकृष्ण याला तेथून बाहेर आणले.
नंतर बाळकृष्ण आणि युवती जवळच्याच एका बसस्थानकात गेले. बसस्थानकावर युवतीला सोडून बाळकृष्ण पुन्हा निघून गेला आणि रात्री ७.४५ च्या सुमारास गणेश गुरव या रिक्षा व्यावसायिकाला घेऊन स्थानकात आला.
बाळकृष्ण याने त्या युवतीला आपण सकाळी गेलो होतो, त्या नातेवाईकाच्या घरी जाऊया असे सांगितले. रिक्षाने येथे जात असताना वाटेत एका वाईन शॉपवर बाळकृष्ण याने रिक्षा थांबवली आणि पीडित युवतीला दुकानातून आणलेली वाईन प्यायला लावली.
त्यानंतर रिक्षा दुसऱ्या एका गावाच्या दिशेने नेली. त्यावेळी संशय आल्याने युवतीने कुठे घेऊन चाललास, असे विचारले; मात्र बाळकृष्ण काहीच बोलत नव्हता.
दरम्यान, जवळच्या त्या गावच्या माळरानावर रिक्षा पोहोचल्यानंतर काही वेळाने दुसऱ्या रिक्षातून शैलेश तांबे त्या ठिकाणी आला आणि पीडित युवतीच्या जवळ बसला. या दरम्यान पीडित युवतीला धुंदी आली. त्याचा फायदा घेऊन शैलेश तांबे, बाळकृष्ण तांबे आणि गणेश गुरव यांनी आळीपाळीने बलात्कार केला.
१६ ऑक्टोबरच्या पहाटे साडेपाच वाजता या तिघांनी आपल्याला घरी सोडले. तसेच झाल्या प्रकाराबाबत कुणाला काही सांगायचे नाही, अशी धमकी दिल्याचे पीडित युवतीने फिर्यादीत नमूद केले आहे.दरम्यान, पीडित युवती घरी पोहोचल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला तिच्या वडिलांनी कणकवली पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत पीडित युवतीने फिर्याद दिली.
पोलिसांत तक्रार झाल्यानंतर तातडीने कार्यवाही करून कणकवली पोलिसांनी गुरुवारी (ता. १८) तिघा संशयित आरोपींना घरातून ताब्यात घेतले. या तिघांवर गुन्हे दाखल करून आज न्यायालयात हजर केले.
या प्रकरणाच्या तपासकामी न्यायालयाने तिघांनाही २५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोस अधिकारी किशोर सावंत, कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















