कशेडी घाट बनला मृत्यूचा सापळा !

banner 468x60

कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

banner 728x90 banner 728x90

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कशेडी बोगद्यामधील एक लेन सुरु होण्याची प्रतीक्षा लागली आहे. अपघाताने शापित असलेल्या कशेडी घाटामध्ये अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे आणि त्यात भर म्हणून मुख्य वळणावर पडलेले खड्डे हे आता जीवघेणे ठरू लागले आहेत.

खड्डे चुकवताना होणारे अपघात ही आता गंभीर बाब बानू लागली आहे. कशेडी बोगदा यातील एक लेन सुरु होणार होती, मात्र गणपती उत्सव तोंडावर आला असतानांही, ती सुरु न झाल्याने सध्याचा प्रवास कशेडी घाटातूनच सुरु आहे.

पडलेल्या खड्ड्यांमुळे मार्गावर होणारे अपघात व वाहतूककोंडी देखील होत असल्याने हे खड्डे बुजवणार तरी कधी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *