जयगड : समुद्रात मासेमारी नौका बुडाली, खलाशी समुद्रात उड्या मारून बचावले

banner 468x60

तालुक्यातील जयगड येथे समुद्रात साई गणेश नावाची मासेमारी नौका बुडाली. ही घटना मंगळवार 12 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

बोटीवरील खलाशी आणि मासेमारी जाळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. जयगड येथील संतोष हळदणकर यांच्या मालकीची ही मासेमारी नौका असल्याची माहिती फिशरिज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बोट मासेमारी करीता जयगड समुद्रात जात असताना ही दुर्घटना घडली. यावेळी बोटीवर तीन ते चार खलाशी होते. जयगड दीपगृह येथे ही दुर्घटना घडली. बोटीवरील खलाशांनी समुद्रात उड्या टाकत स्वतःचा जीव वाचवला.

बोटीवरील मासेमारी जाळी सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून बुडालेली बोट काही काळानंतर किनाऱ्यवर ओढून नेण्यात आली. याबाबत जयगड पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *