शृंगारतली : गुहागर आगारातून बंद केलेल्या बसफेऱ्या पुन्हा सुरु, मनसेच्या मागणीला यश

banner 468x60

प्रतिनिधी ,गुहागर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार गुहागर एस.टी. आगार व्यवस्थापक यांना बंद केलेल्या एसटीच्या फेऱ्या पुर्वरत सुरु करण्याबाबत निवेदन देवून चर्चा करण्यात आली होती.

banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

मनसेच्या मागणीला यश आले असून बंद केलेल्या काही गाड्या पुर्वरत सुरु करण्यात आल्या आहेत. गुहागर आगारातून एस.टी. गाड्या बंद करण्यात आल्या होत्या त्यामध्ये मिरज, कोल्हापुर, तुळजापूर सारख्या लांबपल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या, मिरज व कोल्हापुर ठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली होती

तसेच ग्रामीण भागातीलही गाड्या बंद करण्यात आल्या होत्या
ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत होती, अखेर तालुक्यातील प्रवाशी व विद्यार्थी यांनी मनसेचे उप- जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर ,सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांना माहिती दिली.

त्यांनी तात्काळ आगार प्रमुखांची भेट घेऊन सदरच्या बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी केली.या मागणीनुसार १२.१५ वा.ची गुहागर पाभरे व्हाया कौंढर काळसुर रामाणेवाडी मोहल्ला नवीन फेरी तसेच सकाळी ५ वा. ची गुहागर- तुळजापुर व सकाळी ७.१५ वा.ची गुहागर मिरज या रा. प. फेऱ्या पुर्वरत चालू करण्यात आल्या आहेत बसफेऱ्या पुर्वरत सुरू झाल्याने तालुक्यातून मनसेच्या कार्याचे कौतुक होते.

यावेळी गुहागर मनसेच्या वतीने गुहागर आगर प्रमुख पाथरे यांचे आभार मानण्यात आले,यावेळी आगार प्रमुख पाथरे यांनी गणपती सणासाठी जास्तीत जास्त ग्रुप बुकिंग साठी मनसेच्या वतीने प्रयत्न व्हावेत अशी विनंती केली.

गुहागर मनसेच्या वतीने गुहागर गणपती सणाला येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना जास्तीत जास्त ग्रुप बुकिंग करण्यात यावे असे आवाहन करण्यात येईल असे आश्वासन विनोद जानवळकर व समीर जोयशी यांनी दिले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *