नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण समोर असताना अजून एक आत्महत्या प्रकार समोर आला आहे. गुहागर तालुक्यातील वडद डफळेवाडी येथील 36 वर्षीय तरुण कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
त्यानंतर त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली होती. बेपत्ता झालेल्या या तरुणाचा मृतदेह तब्बल सात दिवसांनी थेट जंगलात झाडाला टांगलेल्या स्थितीत दिसल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
गुहागर तालुक्यातील वडद डफळेवाडी येथील राजाराम उर्फ राजु भाग्या जोगळे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. राजाराम घरातून कोणालाही न सांगता १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रात्री नऊ वाजल्यापासून बेपत्ता झाला होता.
तेव्हापासून त्याची शोधाशोध सगळीकडे सुरू होती. त्याचा ठावठिकाणा कुठेच लागला नव्हता. अखेर १७ ऑगस्ट रोजी गुहागर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
यानंतर सात दिवसांनी गुहागर मधील एका जंगलात त्याचा झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळेला आहे. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे याचा शोध गुहागर पोलीस घेत आहे .

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*