गुहागर : पोलिसांची वर्दी पकडणे पडले महागात

banner 468x60

गुहागर (प्रतिनिधी)

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे भरधाव वेगात येणाऱ्या दोघाजणांना पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता चक्क पोलिसांचीच वर्दी पकडून अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या त्या मद्यपिना गैरवर्तन करणे पडले महागात.

banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909


गटारी साजरी करून आलेल्या या दोघांना पोलिसांनी पोलीस स्थानकात नेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

बुधवारी ४.३ ० च्या सुमारास तुषार व किरण ( रा. असगोली ) शृंगारतळी बाजारपेठ येथे पोलीस चौकीसमोर सार्वजनिक रोडवर स्वताकडे मोटारसायकल चालविण्याचा परवाना नसताना देखील भरधाव, मानवी जीवतास धोका निर्माण होईल.

अशा प्रकारे मोटार सायकल चालवत असताना आरोपी मद्यप्राशन करून भरधाव वेगात गाडी चालवत होता. चौकशीसाठी थांबवले असता ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या वर्दीला हात घालुन अश्लील भाषेत शिवीगाळ करीत आरडाओरडा करू लागला.

पोलिसांनीही त्या व्यक्ती मद्यपान केलेले असल्याचे गांभीर्य ओळखून गुहागर पोलीस स्थानकात नेऊन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंद अधिनियम १९४९ – कलम ८५ (१), ८५ चा (२ ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११०, ११७ मोटर वाहन अधिनियम १९८८ चा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *