गुहागर : समुद्रकिनारी बुडणाऱ्या पर्यटक दाम्पत्याला वाचविण्यात यश

banner 468x60

स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी गुहागरच्या समुद्रात बुडणाऱ्या पतीपत्नीचा जीव असगोलीतील मच्छीमाराने आणि गुहागर पोलिसांनी वाचवला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे आणि पाऊस कमी असल्याने १२ ऑगस्टपासून गुहागरातील पर्यटन व्यवसाय बहरला. आलेल्या बहुतांशी पर्यटकांचे पहिले आकर्षण हे समुद्रच असते.

त्यामुळे समुद्रावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. बुधवारी सायंकाळी दोन कुटुंबे समुद्रात डुंबण्याच्या तयारीने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आली. त्यांच्याजवळ लाइफ सेव्हिंग बोया रिंगदेखील होत्या. संध्याकाळी भरती असल्याची माहितीही त्यांनी घेतली होती.

या दोन कुटुंबांमधील काही मंडळी बोया रिंग कमरेत अडकवून समुद्राच्या लाटांवर स्वार होत दंगामस्ती करत होती. त्यांच्यातील चाळिशीचे एक जोडपे मस्ती करता करता खोल समुद्रात गेले. पायाखाली जमीन लागत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा सुरू केला. समुद्रात दोघेजण बुडत आहेत हे समजल्यावर तातडीने पोलिसांनी, ग्रामस्थांनी दोरखंड आणि अन्य जीवरक्षक साहित्य आणण्यासाठी धावपळ केली.

तेवढ्यात एक इसम समुद्रात शिरला, सफाईने खोल समुद्रात जाऊन त्याने बुडणाऱ्या त्या दोघांना वाचवले. त्या दोन कुटुंबांसाठी तो देवदूत ठरला. असगोलीतील मच्छीमारी करणारा चिंतामणी राघो मोरे असं त्यांचं नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *