शृंगारतळी : रिगल कॉलेजमध्ये रानभाज्या रेसिपी स्पर्धा

banner 468x60

 रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये नुकतीच रानभाज्या रेसीपी स्पर्धा संपन्न झाली. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा संपन्न झाली.

या स्पर्धेसाठी परीक्षक व प्रमुख पाहुणे म्हणून शांताई रिसोर्टचे सिद्धेश खानविलकर व त्यांचे सहकारी साळवी उपस्थित होते. पावसाळी ऋतूमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात.

banner 728x90

याचेच औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये रानभाज्यांचे महत्व, त्यांची ओळख आणि आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांबद्दल जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने रिगल कॉलेजमध्ये सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रानभाज्या स्पर्धेच्या अनुषंगाने उपस्थित परीक्षकांनी हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना वेवेगळ्या हॉटेल सर्विसेसची माहिती दिली. शिक्षण घेतल्यानंतर जॉबच्या वेगवेगळ्या संधी कशा प्रकारे उपलब्ध याविषयी विस्तृत माहिती दिली. त्यात होणाऱ्या ट्रेनिंग विषयी तसेच भाषेचे महत्व पटवून दिले.

रानभाज्या रेसीपी स्पर्धेमध्ये रिगल कॉलेज शृंगारतळीच्या ५० ते ५५ मुलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शाहरुख चोगले आणि स्पर्धेचे आयोजन हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रा. विक्रम खैर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *