गुहागर : वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू; गुहागर- चिपळूण मार्गावरील घटना

banner 468x60

गुहागर चिपळूण या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर देवघर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909


पहाटे ४ च्या सुमारास ही घटना झाली असल्याचा अंदाज वनविभागाच्यावतीने व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील गुहागर चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील देवघर स्टॉप पासून 200 मीटर अंतरावर नर जातीचा हा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.

मृत अवस्थेत असलेला हा बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच साधारण ७ ते ८ वर्ष वयाचा हा बिबट्या आहे.

वनविभागाला याची माहिती मिळताच वनपाल संतोष परशेटे, वनरक्षक अरविंद मांडवकर , दुडगे यांनी पहाटे ६.३० वाजता घटनास्थळी पोहोचून बिबट्याचा शव ताब्यात घेतला आहे. या घटनेचा पुढील तपास परीक्षेत्र वन अधिकारी चिपळूण राजश्री कीर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *