गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर च्या वतीने एस.टी.चे अधिकारी, कर्मचारी यांना फराळाचे वाटप.

banner 468x60

संपर्क अध्यक्ष प्रमोदशेठ गांधी यांचा स्तुत्य उपक्रम

पाठपन्हाळे (योगेश तेलगडे ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने गुहागर एस.टी. आगारमधील सर्व अधिकारी, चालक-वाहक,

कार्यशाळेतील कर्मचारी, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक यांना दिवाळी सणानिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम

गुहागर एस.टी आगार येथे घेण्यात आला.यावेळी गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर, सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, सुरेंद्र निकम, उपतालुकाध्यक्ष मंदार रहाटे, गुहागर आगाराचे सहा. निरीक्षक सुनिल पवार, प्रविण कदम,विवेक गानू, उपस्थित होते. यावेळी गुहागर एस.टी. आगार कर्मचाऱ्याच्या वतीने ता. संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचारी विवेक गानू यांनी सांगितले की, आगारातील चालक वाहक आपले कुटुंबिय,घरदार सोडुन सेवा करत असतात, दिवाळी मध्ये आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करू शकत नाहीत या सगळ्यांची जाण ठेवुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवाळीच्या फराळाचे वाटप केले. त्यामुळे आम्ही सर्व एसटी कर्मचारी मनसेचे आभार मानत आहोत. गणेश उत्सव काळात २५० गाड्या गुहागरात आल्या होत्या, या सर्व चालक वाहक कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्थादेखील मनसेच्या वतीने करण्यात आली होती. एसटी आंदोलनाच्या काळात सर्वप्रथम धावुन येणारे मनसेचे कार्यकर्ते होते. काहीही कारण एसटी कर्मचाऱ्यांसाठी केसेस अंगावर घेण्याचे,तुरुंगवास भोगण्याचे कामही मनसे पदाधिकारी यांनी केले होते. दिवाळी सणाचा उत्साह वाढवण्यासाठी मनसे कडून मिळालेली प्रेमाचे भेट आम्ही सर्व कर्मचारी आनंदाने स्वीकारत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी बोलताना गुहागर आगाराचे सहाय्यक निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले की एसटीच्या ३५ वर्षाच्या सेवेमध्ये असा कार्यक्रम कधी झाला नाही तो आज मनसेच्या माध्यमातून होत आहे, मनसे कडून कर्मचाऱ्यांना शाबासकीची थाप व कर्मचारी बद्दल असलेले प्रेम हे आज व्यक्त होत आहे, त्यामुळे मनसेचे आभार मानावे इतके थोडे आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *