गुहागर : ‘ऐकावे’ ते नवलच! खड्डेमय रस्त्यामुळे पडवे एसटी फेऱ्या बंद

banner 468x60

गुहागर तालुक्यातील सावर्डे – तवसाळ या राज्य मार्गावरून पडवे एसटी स्टँड येथे जाणारा पोचमार्ग हा खड्डेमय झाला आहे. यामुळे इथून प्रवास करणं जिकरीचे झालेले आहे.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

नुकतेच या खड्ड्यामुळे एसटीचा अपघात होता होता वाचला. त्याचबरोबर जीवितहानी आणि वित्तहानी टळली आहे. याचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पडवे गावात जाणाऱ्या एसटी फेऱ्या बंद केल्या आहेत.

यामुळे गावात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या आणि व्यवसाय करणारा मच्छी व्यवसायिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक,कनिष्ठ – वरिष्ठ महाविद्यालयीन,आयटीआय विद्यार्थी, नियमीत प्रवासी यांना फार मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या सर्वांच्या सोयीचा विचार करून आणि येणारा गणपती उत्सव लक्षात घेत पडवे पोचमार्गाचे खड्डे भरण्याचे काम तात्काळ करण्याची मागणी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी लेखी निवेदनाद्वारे उप अभियंता जि.प. बांधकाम विभाग पंचायत समिती गुहागर यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *