गुहागर : समुद्रकिनारी पुन्हा सापडली चरसची 31 पाकिटे

banner 468x60

दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर अमली पदार्थ जप्त केल्याची घटना घडत असताना आता गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर निळ्या रंगाची चरसची पाकिटे मिळून येत आहेत.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

गेल्या चार दिवसांत चरसची पाकिटे मिळून येण्याचे प्रमाण वाढत आहे. मंगळवारी दुपारच्या दरम्यान गुहागर शहरातील वरचा पाट बाग परिसर, असगोली समुद्रकिनारा आदी भागातून तब्बल ३१ पाकिटे मिळून आली आहेत.

तालुक्यातील गुहागर, वेलदूर, अंजनवेल, असगोली, पालशेत, अडूर कोंडकारूळ, वेळणेश्वर, बोऱ्या, तवसाळ दाभोळखाडी आदी ठिकाणी गुहागर पोलिसांनी गस्त सुरू ठेवली आहे. तर दुसऱ्या बाजूला कस्टम विभागही या किनाऱ्यावर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, अशा प्रकारची पाकिटे मिळून आल्यास जनतेने तातडीने गुहागर पोलिस ठाण्यामध्ये अथवा त्या गावातील पोलिस पाटील यांच्याजवळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी कस्टम विभागाने २० किलो ७०० ग्रॅम चरस जप्त केले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत गुहागर समुद्रकिनारी पुन्हा चरसची ३१ पाकिटे मिळून आल्याने पोलिसांनी परिसरात आपला पहारा कडक केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *