पऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या संगमेश्वर तालुक्यातील अंणदेरी येथील महिलेचा कातळावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
गुरुवारी (दि. २१) दुपारी घडलेल्या घटनेचा माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. दुपारी १२.३० वाजताच्या अणदेरी होडेवाडीतील चार महिला घराशेजारील पऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.
त्यापैकी सुनीता जयराम होडे (वय ५६) या महिलेचा कातळावरून पाय घसरल्याने पाण्यात बुडाल्या. सकाळ पासून पावसाचा जोर वाढला असल्याने पऱ्यामधील पाणी पातळीत वाढ झाल्याने सुनीता या पाण्यातून वाहत गेल्या. सुनीता या वाहत जाताना पाहुन इतर महिलांनी आरडा ओरडा केला.
नजीक असणा-या ग्रामस्थांनी पऱ्याकडे धाव घेतली, शोधाशोध केली असता नजीकच त्या मिळून आल्या. गावचे सरपंच दिनेश मालप, बाळु होडे, विश्वास होडे यांच्या मदतीने त्या महिलेचे पती जयराम होडे यांनी तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मृत असल्याचे घोषीत केले. या घटनेने ऐन गणेशोत्सवात अणदेरी गावावर शोककळा पसरली आहे.मृत सुनीता यांच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.
या घटनेची माहिती ग्रामस्थानी संगमेश्वर पोलिसांना दिली असून आधिक तपास फणसवणे बिटचे अंमलदार सचिन कामेरकर करीत आहेत.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*