देवरुख : पूर गावात दोन भाऊ बुडाले

banner 468x60

देवरुख जवळील पूर गावातील दोन सख्खे भाऊ सप्तलिंगी नदित बुडाल्याची घटना रविवारी दुपारी दोनच्या दरम्याने घडली. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

banner 728x90

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

सचिन उर्फ बाल्या झेपले व गणेश उर्फ सागर झेपले अशी त्यांची नावे आहेत. ३५ ते ४० या वयोगटातील हे भाऊ आहेत. सप्तलिंगी नदीपत्रातील चिऱ्याचा कोंड येथील घटना सचिन झेपले हा पत्नीसह कपडे धुवायला गेला होता.

तो पोहत असताना बुडू लागला. पत्नीने लगेच घरी जाऊन दिराला याबाबतची माहिती दिली. दीर गणेशने सचिनला वाचवण्याकरिता नदीपत्राच्या दिशेने धाव घेतली. मात्र तोही बुडाला गणेश याचा मृतदेह सायंकाळी साडेचार वाजता सापडला.

दुसर्‍या भावाचा शोध सुरु होता. संध्याकाळी काळोख पडल्यावर ही शोध मोहिम थांबवण्यात आली. गणेश झेपले हे अविवाहीत आहेत तर सचिन झेपले यांना लहान दोन मुली आहेत.

घरी आई वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे. दोघे भाऊ सेंट्रींगची कामे करत असत. दोन भाऊ बुडाले याची खबर नागरीकांना लागताच मदत कार्य सुरु झाले.संध्याकाळी गणेश झेपले यांचा मृतदेह मिळाला.

देवरुख पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असुन गणेश झेपले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देवरुख येथे आणण्यात आला. पुर गावातील नागरीक,विविध सामाजिक काम करणारे कार्यकर्ते या शोध मोहिमेत सहभागी झाले होते. देवरुख पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *