दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार योगेश कदम यांनी संबंधित आधिकारी यांच्या समवेत म्हाप्रळ आंबेत पुलाची पाहाणी केली.
गेले अडीच वर्ष बंद असलेला आंबेत पूल आजपासून (२० ऑक्टोंबर ) वाहतुकीसाठी सुरु होणार आहे, तसेच याचे लोड टेस्टिंगयशस्वी झाले आहे.
सदर आंबेत पूल आता वाहतूकीसाठी सुरळीत चालू होईल असे आमदार योगेश दादा कदम यांनी यावेळी सांगितले. तसेच या संदर्भात काही सुचना देखील आमदार योगेश दादा कदम यांनी संबंधीत अधिकारी यांना केल्या.
शिवसेना तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, महिला विधानसभा समन्वयक अस्मिता केंद्रे, विभागप्रमुख इरफान बुरोंडकर, संजय शेडगे, दिपक मालुसरे, उपविभागप्रमुख दिनेश गायकवाड, शहरप्रमुख नगरसेवक गटनेता विनोद जाधव, नगरसेवक मुश्ताक दाभिळकर, कार्यालय प्रमुख संतोष पार्टे, सचिव सिध्देश देशपांडे, सल्लागार नागेश घोसाळकर, युवासेना तालुका समन्वयक अजहर मुकादम, अहमद मुकादम, माजी सरपंच अनंत बेर्डे, युवासेना उपतालुकाधिकारी रुपेश निगुडकर, संजय खांबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*