दापोली : परतीच्या पावसाचा पहिला बळी, नदीपात्रात पडल्याने एकाचा मृत्यू

banner 468x60

अरबी समुद्रात चक्रीवादळ (Cyclone) निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीसह पाऊस (Konkan Rain) पडत आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शनिवारी (ता. ३०) जिल्ह्यातील नौका बंदरातच उभ्या होत्या.

banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

पावसासह वादळाचा प्रभाव दोन दिवस राहील, अशी शक्यता वर्तवण्यात (Meteorology Department) आली आहे. दापोलीत देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. घरांचं नुकसान झालं, पाणी साचलं आहे.

दापोली तालुक्यातील आसूद या ठिकाणी नदीपात्रात पडल्याने गावातील अनंत शांताराम धामणे (४५) याचा बुडून मृत्यू झाला आहे.


अतिवृष्टीचा पहिला बळी आसूदमध्ये गेलाय. सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली आहे.

अनंत धामणे हा मुरुड येथून नदी काठाहून घरी येत असताना त्याचा तोल गेला आणि तो नदीत पडला असल्याची माहिती आहे.

दरम्यान अनंत धामणेलला दारुचं व्यसन होतं अशी ही माहिती कळतीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *