दापोली : ऐकावे ते नवलच ! खालीद रखांगे यांचा जावई शोध रस्त्यालगत गटार नाहीत म्हणून रस्त्यावर खड्डे पडतात

banner 468x60

दापोली नगरपंचायतचा भोंगळ कारभार समोर आला आहे. दापोलीत सध्या रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत. दापोलीत रस्त्यांच्या कामांना ग्रहण लागलंय की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

लाखो रुपये कर देणाऱ्या दापोलीच्या नशिबी खड्यांसोबत अनेक समस्या आहेत. या सर्व प्रकारावर दापोली नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी म्हटलंय प्रत्येक वर्षी रस्ता खराब होतो आणि यावर्षीही झालाय.

पाहूयात कोकण कट्टा लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट

रस्त्याच्या बाजूला गटार नाहीय त्यामुळे पावसाचं पाणी याठिकाणी साचतो, हा तर खालिद रखांगे यांचा जावई शोध म्हणावा लागेल

. जर गटार नाहीय आणि या रस्त्याची दरवर्षी अशी परिस्थिती होते तर दापोली नगरपंचायत काय करतेय रस्ते पाणी आरोग्य या सुविधा देणं हे लोकप्रतीनिधींच काम आहे, यासाठीच आपण त्या खुर्चीवर बसलात.

नागरिकांचे जीव गेल्यानंतर त्या रत्स्याची डागडुजी करणार का हा प्रश्न आहे दापोलीकरांचा . जर दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होतेय तर दापोली नगरपंचायत झोपा काढतेय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *