दापोली : अवघा रंग एक झाला, हिंदू-मुस्लिम ऐक्य वाखण्याजोगे

banner 468x60

22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्या राम जन्मभूमी (Ram Janmabhumi) ही देशातील सर्वात प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या संघर्षाचे एक प्रकरण राहिले आहे.

banner 728x90

राम जन्मभूमीवरील राम मंदिर (Ram Mandir) हे 495 वर्षांची प्रतीक्षा आहे. 1528 ते 2023 पर्यंत या काळात अनेक घडामोडी घडल्यात. गावागावात देखील येच वातावरण पाहायला मिळत आहे. या आनंदांत मुस्लिम बांधव ही मागे नाहीयत त्यांनी देखील या आनंदात आपला सहभाग दर्शवला आहे.

शशांक सिनकर यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य! याबाबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. हिंदू-मुस्लिम व इतर समाजबांधव हे एकत्रित येऊन सर्वधर्म समभावाची भावना जागृत झालेली पाहायला मिळत आहे.

गेले आठवडाभर आम्ही सर्व कार्यकर्ते अयोध्येहून आलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या अक्षता आणि निमंत्रण पत्रिका वाटपाच्या कार्यामध्ये व्यस्त आहोत. यावेळी अनेक चांगले वाईट अनुभव आले.

मात्र आजचा माझ्याच गावातील अनुभव सुखद आणि प्रचंड आशावादी होता. आज आम्ही मुरडे गावातील वाडीवस्त्यांवर निमंत्रण पत्रिका वाटत असताना मोहल्ल्यात गेलो. रस्त्यातच आम्हाला मुश्ताक माखजनकर हे युवा कार्यकर्ते भेटले. आम्ही त्यांना प्रभू श्रीरामांच्या अयोध्येहून आलेल्या अक्षता आणि निमंत्रण पत्रिका देण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यांनी देखील लागलीच आम्हाला मोहल्ल्याचे प्रमुख नुरमोहम्मद माखजनकर यांची भेट घडवून आणली आणि त्या दोघांनीही आम्हाला आजच मोहल्ल्यात या असे सांगितले. कारण आज शुक्रवार असल्याने नमाजासाठी सर्वजण मशिदीत भेटतील असे सांगितले. माझ्याबरोबर सोपान गुहागरकर, सुनील पाचरेकर आणि सदानंद दळवी असे आम्ही चौघेजण दुपारी बरोबर दिड वाजता मशिदीजवळ पोहोचलो. आणि आश्चर्य म्हणजे मोहल्ल्यातील लोक आमचीच वाट पहात होते.

आम्ही सर्वांना येण्याचे कारण सांगितले. आणि त्यांना निमंत्रण पत्रिका दिल्या. यावर तेथील बुजुर्ग असलेल्या कासम चाचांनी,”तुम्ही आलात याचा आम्हाला खूप आनंद झाला. राम हा राष्ट्रपुरुष आहे.

आपला धर्म जरी वेगळा असला तरीही आपली संस्कृती एक आहे. आम्ही हे निमंत्रण आनंदाने स्वीकारतो.” असं सांगितलं. आम्ही धन्य झालो. जातेवेळी असलेल्या मनातील शंका येतेवेळी मात्र दूर पळाल्या होत्या. रामरूपी श्रीरंगाने अवघा रंग एक केला होता. जय श्रीराम!

  • शशांक सिनकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *