दापोली : बसस्थानक शेजारी मटका तेजित

banner 468x60

दापोली शहरातील बसस्थानकाशेजारी ऑनलाईन मटका अगदी खुलेआम सुरू आहे. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे.

त्यामुळे याबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. दापोली शहरात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर दारू व्यवसाय, पत्यांचे तीन पानी डाव हे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत?

banner 728x90

असा सवालदेखील नागरिक यानिमित्ताने उपस्थित करत आहेत. ज्या ठिकाणी हे मटका सेंटर चालविले जाते त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक सुविधा असल्याने लोकांची वर्दळ असते.

ऑनलाईन लॉटरीच्या विरोधात या आधी नागरिकांनी पोलिसात तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, तरीही कारवाई केलेली दिसून आली नाही. या लॉटरीच्या मोहात शाळकरी मुले फसत असल्याचं नागरिकांचं म्हणंण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *