दापोली : उपजिल्हा रुग्णालयाची भिस्त 7 बी.ए.एम.एस डॉक्टरांवर, तीन महिन्यात तब्बल १५,५७८ रुग्णांवर केले उपचार

banner 468x60

नांदेड जिल्हा रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे. रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती जाणुन घेण्याकरिता रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच तहसीलदार कर्मचारी यांना भेटी देऊन पाहणी करावी असे निर्देश यापुर्वी दिले आहेत.

परंतु दापोली उपजिल्हा रुग्णालयात एकही तज्ञ डॉक्टर नसताना केवळ एक एम.बी.बी.एस डॉ. वैष्णवी भावे, बी.ए.एम.एस आयुष अधिकारी डॉ. प्रदिप बनसोडे, आयपीएचएस-आरबीएसके अंतर्गत डॉ. श्राव्या शेट्ये, डॉ. मानसी पानसे, डॉ. प्राची श्रीरामे, डॉ. स्वप्नील भोजने, डॉ. चंद्रशेखर गोडकर, डॉ. समर्थ पेंढारी या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दापोली उपजिल्हा रुग्णालयाची भिस्त आहे.

banner 728x90

दापोली उपजिल्हा रुग्णालयात आयुष-१ व आयपीएचएस अंतर्गत आरबीएसके अंतर्गत ६ असे ७ वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहेत. दापोली उपजिल्हा रुग्णालयात एकही तज्ञ डॉक्टर नसताना दापोली उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर्स आपली सेवा देत आहेत.

या डॉक्टरांच्या जोडीला उपजिल्हा रुग्णालयातील सर्वच तज्ञ परिचारिकांसहित इतर कर्मचारी देखील आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत. दापोली उपजिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी देत असलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत.

दापोली तालुक्यात मागील तीन महिन्यात तब्बल बाह्यरुग्ण विभागात 14664 व आंतररुग्ण विभागात 914 एकुण 15578
एवढ्या रुग्णांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आहेत. डॉक्टरांची संख्या कमी असतानाही डेंग्यू व अन्य आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले.

दापोली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वच पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिक्षक मंजुर 01पदापैकी रिक्त-01, वैद्यकीय अधिकारी 2 मंजुर पैकी 2 रिक्त, वैद्यकीय अधिकारी (स्त्री रोग तज्ञ) पदांपैकी 1 मंजुर पैकी 01 भरलेले परंतु उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे प्रतिनियुक्तीवर, वैद्यकीय अधिकारी (सर्जन)1 मंजुर पैकी 1 रिक्त, वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण)1 मंजुर पैकी 1 रिक्त, वैद्यकीय अधिकारी (भिषक)1 मंजुर पैकी 1 रिक्त, वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ)1 मंजुर पैकी 1 रिक्त, सहाय्यक अधिसेविका 01 मंजूर पदापैकी 01 रिक्त, परिसेविका-02 पैकी 02 भरले, अधिपरिचारिका 12 पैकी 10 भरले तर 02 रिक्त, क्ष-किरण तंत्रज्ञ 01 मंजुर पदापैकी 01 भरलेले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01 मंजुर पदापैकी 01 भरलेले, सहाय्यक अधिक्षक 01 मंजुर पदापैकी 01 रिक्त, औषध निर्माण अधिकारी 03 मंजुर पदापैकी 02 भरलेले तर 01 रिक्त, नेत्रचिकित्सा अधिकारी 01 मंजूर पदापैकी 01 रिक्त, वरिष्ठ लिपीक 01 मंजुर पदापैकी 01 रिक्त, प्रयोगशाळा सहाय्यक 01 मंजुर पदापैकी 01 भरलेले, कनिष्ठ लिपिक 01 मंजुर पदापैकी 01 भरलेले, बाह्य रुग्ण लिपिक 01 मंजुर पदापैकी 01 रिक्त, शिपाई 02 पदापैकी 01 भरलेले तर 01 रिक्त, कक्षसेवक 05 पदापैकी 02 भरलेले तर 03 रिक्त, शस्त्रक्रिया गृहपरिचर 01 पदापैकी 01 भरलेले, बाह्यरुग्ण सेवक 01 मंजुर पदापैकी 01 भरलेले, व्रणोपचारक 01 मंजुर पदापैकी 01 भरलेले, सफाईगार 02 मंजूर पदापैकी 02 भरलेले आहेत.

यामुळे दापोली उपजिल्हा रुग्णालयात एकही कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी कार्यरत नाही.

एकमेव एम.बी.बी.एस डॉ.वैष्णवी भावे या देखील सोडुन गेल्याने उपजिल्हा रुग्णालयात बी.ए.एम.एस. 7 वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *