दापोली तालुक्यातील टाळसुरे बौद्धवाडी येथील एका १४ वर्षीय मुलाला फुस लावून नेल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
शाळेत जातो म्हणून बाहेर पडलेला हा मुलगा रिक्षातून चालक बाजूला बसून खेडला गेल्याचे अनेकांनी पाहिले. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो खेड रेल्वेस्थानकात आढळून आल्याने मुंबईत गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी हा मुलगा शाळेत जातो सांगून बाहेर पडला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत घरी न आल्यामुळे त्याची शोधाशोध सुरू झाली.
शाळेत चौकशी केली असता तो गैरहजर असल्याचे समजले. पालकांनी त्याचे मित्र तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली असता तो कोठेही आढळला नाही. म्हणून दापोली पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली.
परिसरात चौकशी केली असता हा मुलगा सकाळी एका रिक्षामध्ये चालकाच्या बाजूला बसून खेडकडे जाताना काही लोकांनी पाहिल्याचे सांगितले. त्यानुसार खेड येथील रेल्वेस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता रेल्वेस्थानकावर तो फिरताना आढळून आला.
रेल्वेने तो मुंबईकडे गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















