गोविंदा रे गोपाळा, अशा गाण्यावर थिरकत मोठ्या जल्लोषात साजरा होणाऱ्या दहीहंडीसाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत. गोपाळकाल्याच्या दिवशी गुरुवारी (ता. ७) जिल्ह्यात ३०९ सार्वजनिक, तर ३ हजार ४३ खासगी दहीहंड्या बांधल्या जाणार आहेत.
🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
त्या फोडण्यासाठी येणाऱ्या गोविंदा पथकांना बक्षिसांची लयलूट करायला मिळणार आहे. प्रतिष्ठेसाठी राजकीय पक्षांच्या लाखो रुपयांच्या हंड्या ठिकठिकाणी बांधण्यात आल्या आहेत. रत्नागिरीमध्ये राजकीय हंड्या उभारण्याची जागा यंदा बदलली असून मांडवीऐवजी भाट्ये किनारी त्या बांधल्या जाणार आहेत.
गतवर्षीपेक्षा यावर्षी दहिहंड्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. थरांवर थर लावण्याचा सराव गेले काही दिवस ग्रामीण भागात सुरू आहे. जिल्ह्यात शहर परिसरात ७ ते ८ थर असणाऱ्या हंड्या बांधल्या जातात. यंदा राजकीय कल्लोळ सुरू असल्यामुळे शहर परिसरात विविध ठिकाणी राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. रत्नागिरी शहरातील मांडवी किनारी होणाऱ्या दहिहंडीचा उत्सव संरक्षक बंधाऱ्यामुळे या वर्षी तो भाट्ये समुद्रकिनारी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून तसे जाहीर केले आहे.
दापोली तालुक्यात ३८ सार्वजनिक तर ३२७ खासगी दहीहंड्या फुटणार आहेत. घराघरात दहीहंडी सण साजरा केला जातो. तालुक्यात गोपाळकालाच्या दिवशी गावात घरोघरी जाऊन गोविंदा हंड्या फोडल्या जाणार आहेत.
पूर्वी मोजक्याच घरात हंडी फोडली जात होती. आता प्रत्येक घरात हौस म्हणून छोटीशी हंडी बांधून ती फोडली जाते. गोविंदा कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दापोलीचे पोलिस लक्ष ठेवून आहेत.
रत्नागिरी शहर ९ ९०
रत्नागिरी ग्रामीण ०० १८२
जयगड ५९ ८१
राजापूर ४० ७०
नाटे ३० ८५
देवरूख ९ ५०
सावर्डे २ ४५
चिपळूण १५ २९०
अलोरे ६ ३०
गुहागर १ २२५
खेड २४ ५००
दापोली ३८ ३२७
मंडणगड १९ १७९
बाणकोट १ ३८१
पूर्णगड १५ ३०
दाभोळ ४ २५७

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















