दापोली : कोळंबीचा लॉट, 100 रूपये किलो दराने विकली जातेय कोळंबी

banner 468x60

केळशी किनारा मोहल्ला येथील मच्छिमार बांधवांच्या जाळयात कोळंबीचा लॉट सध्या लागत आहे. कधी नव्हे ती कोळंबीची प्रचंड आवक वाढल्याने 100 रूपये प्रती किलो दराने कोळंबीची विक्री केली जात आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

दापोली तालुक्यातील केळशी येथील किनारा मोहल्ला येथील मच्छिमार बांधवाच्या जाळयात गेल्या आठ दिवसापासून दररोज कोळंबी मोठया प्रमाणात मिळत आहे.

त्यामुळे मच्छिमार बांधव एकीकडे खुशीत असले तरी वाढलेल्या कोळंबीच्या आवकेमुळे 500 रूपये प्रति किलो दराने दहा दिवसापूर्वी विकली जाणारी कोळंबी चक्क आता 100 रूपये प्रती किलो दराने विकावी लागत आहे. यापूर्वी जागेवरच विकली जाणारी कोळंबी आता दापोली बाजारपेठेत येवून मच्छिमार महिला विक्रेत्यांना ठिक ठिकाणी बसून कोळंबी विकावी लागत आहे.

असे असले तरी कोळंबीच्या उतरलेल्या दरामुळे मच्छिमारांना मात्र चांगलाच घाटा सहन करावा लागत आहे. मच्छि ही नाशीवंत असते त्यामुळे मच्छिची विक्री तातडीने करावी लागते. तसे झाले नाही तर मच्छिची किंमत मातीमोल होते. केळशी किनारा मोहल्ला हा तसा मोठया लोकवस्तीचा मोहल्ला आहे या ठिकाणी दालदी समाज वर्गातील मच्छिमार मोठया प्रमाणात आहेत.

स्वच्छ आणि ताजी मासळी मिळण्याचे हे ठिकाण ओळखले जाते. या ठिकाणाहून केळशी या गावासह केळशी परिसरातील उंबरशेत, मांदिवली, रावतोळी कवडोली, रोवले, वांझळोली आमखोल, डौली,आंबवली बुद्रुक, आतगाव या दापोली तालूक्यातील गावांसह मंडणगड तालूक्यातील खारी, साखरी, जावळे, आंबवली खुर्द, चिंचघर, शेवरे, केंगवळ, वेळास आदी गावात मासळी विकली जाते.

मुख्य म्हणजे येथील महिलांची एक खासियत आहे दापोली मंडणगड तालूक्यात सर्वच गावातपायपीठ करत सुकी मासळी येथील महिला वर्गाकडून विक्रीचा व्यवसाय केला जातो. पावसाळा आणि माशांचा प्रजोत्पादनाचा काळ लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसाच्या बंदिकाळा नंतर हवामानाचा बदलत्या वातावरणानंतर कुठेसा आता आताच मासेमारी हंगाम सुरू झाला होता.

त्या मासेमारीच्या शुभारंभाच्या हंगात मासळीची आवकही चांगलीच वाढली होती मात्र आवक वाढल्याने मासळीचे दर अपेक्षेपेक्षा खुपच खाली उतरल्याने मासेमारांची कमाईची संधी मात्र चांगलीच हुकली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *