दाभोळ : दाभोळ सरपंचांचा राजीनामा

banner 468x60

दाभोळ ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता दाभोळकर यांनी ठरल्याप्रमाणे सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने या पदासाठी निवडणूक होणार आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

या पदावर महिला सदस्य राखी तोडणकर यांची निवड होणार आहे. अडीच वर्षापूर्वी झालेल्या दाभोळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पॅनल विजयी झाले होते.

त्या वेळी सागरपुत्र सभागृहात झालेल्या एका बैठकीत पहिल्या अडीच वर्षाकरिता सरपंच म्हणून संगीता दाभोळकर व उपसरपंच म्हणून उदय जावकर तर पुढील अडीच वर्षाकरिता सरपंच म्हणून राखी तोडणकर व उपसरपंच म्हणून अभय गोयथळे यांना संधी देण्याचे ठरवण्यात आले होते.

अडीच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे दाभोळकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी राखी तोडणकर यांची निवड होणार आहे.

ही निवड होईपर्यंत प्रभारी सरपंच म्हणून उपसरपंच उदय जावकर यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे.

सरपंचपदाची निवड झाल्यानंतर उपसरपंच उदय जावकर यांनी राजीनामा दिल्यावर उपसरपंचपदासाठी अभय गोयथळे यांची निवड निश्चित मानली जात आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *