दाभोळ : फार्महाऊस फोडून साडेदहा हजारांचा ऐवज केला लंपास

banner 468x60

दाभोळ पोलिस हद्दीत कोळथरे सडा येथील फार्म हाऊस फोडून सुमारे १० हजार ४०० रुपयांची चोरी केल्याची घटना बुधवार दि. २ ऑगस्ट रात्री ८ ते शनिवार ५ ऑगस्ट सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909


दाभोळ पोलिस ठाण्यात विराज आगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याने कोळथरे सडा येथे असणाऱ्या फार्म हाऊसमध्ये खिडकी तोडून फार्महाऊसमध्ये प्रवेश करून फार्म हाऊसमध्ये असणारे साहित्य चोरून नेले.


चोरीच्या मध्ये ६००० रुपये रोख रक्कम, १००० रुपये किमतीच्या दोन बादल्या, २००० किमतीचे चार टर्कीस टॉवेल, १००० रुपये किमतीचा किचनमधील सुरींचा सेट, ४०० रुपये किमतीची झाडे कट करण्याची कात्री असा सुमारे दहा हजार चारशे रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दाभोळ पोलीस करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *