दाभोळ : मासे मृत प्रकरणाची आमदार शेखर निकम यांच्याकडून दखल

banner 468x60

तालुक्यातील दाभोळ खाडीत रासायनिक दूषित पाणी सोडल्याने मासे मृत झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909

या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.

तर बुधवारी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती आ. निकम यांनी दिली. दाभोळ खाडीत वेगवेगळ्या प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात मिळू लागली असतानाच गेल्या दोन दिवसांपासून खाडी मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याची घटना समोर आली आहे.

यामुळे खाडी परिसरातील मच्छीमार बांधव धास्तावले आहेत. या संदर्भात दाभोळ खाडी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संपर्क साधून माहिती दिली असता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा करत मृत मासे, पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असल्याचे समोर आले आहे.

या घटनेची आमदार शेखर निकम यांनी तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे निवेदन दिले आहे. यानुसार चिपळूणसह गुहागर, दापोली, खेड या चार तालुक्यात दाभोळ खाडी सामावलेली आहे.

चिपळूण तालुक्यातील गोवळकोट ते गुहागर तालुक्यातील अंजनवेल दरम्यान खाडी किनारी भोई समाजाची एकूण ४२ गावे वसलेली आहेत. या समाजाचा पारंपरिक व्यवसाय मासेमारी आहे. मात्र, सदर खाडीत दूषित पाणी सोडल्याने खाडीतील मासे मृत होत आहेत. यामुळे भोई समाजाचा मासेमारी हा पारंपारिक व्यवसाय धोक्यात येऊन त्यांचेवर उपासमारीची परिस्थिती उद्भवत आहे.

चिपळूण तालुक्यातील केतकी भोईवाडी येथील खाडीतील मासे मृत प्रकरणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी ग्रामस्थांच्या समवेत पाहणी केलेली असता भिले, सोनगाव, कोतवली, गोवळकोट, धामणदेवी, सोनगाव, भिले, केतकी, कोतवली, मेटे, आयनी, बहिरवली, तुंबाड, शिर्शी, शिव पन्हाळजे, होडखाड, मालदोली, चिवेली, दाभोळखाडी लगतची सर्व गावे प्रदूषणामुळे बाधित झाली आहेत, असे त्यांचे निदर्शनात आलेले आहे.

त्या पाहणीत प्रदूषित पाण्यामुळे खाडीमध्ये मिळणारे मासे रेणवी कालचडू, चित्ताडा, पालू, बोय, तांबुस खरबा इ. माश्यांच्या जाती मृत अवस्थेत आढळून येत आहेत. संबंधित विभागाने त्यावेळी पाणी व मृत माश्यानांचे नमुने संकलीत केलेले आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *