दाभोळ : “कोकण कट्टा लाईव्ह” च्या बातमीनंतर दाभोळ ग्रामपंचायतचा प्रसिद्धी पत्रक जारी

banner 468x60

दापोली तालुक्यातील दाभोळ कन्या शाळेचं भीषण वास्तव समोर आल्याची बातमी “कोकण कट्टा लाईव्ह” न्यूज चॅनलने प्रसिद्ध केली होती.

“दाभोळ : दाभोळ ग्रामपंचायतच्या आडमुठे धोरणामुळे गावातील ३५ मुलींचं शिक्षण धोक्यात, ग्रामपंचायतचा निर्णय आर्थिक की सामाजिक?”

या बातमीनंतर दाभोळ ग्रामपंचायतने आपली बाजू मांडण्यासाठी एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे.

मुलींच्या शैक्षणिक भवितव्याबाबतही प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्याची बातमी “कोकण कट्टा लाईव्ह”ने दिली आहे.

या बातमीची दखल दापोली तहसीलदार, पंचायत समिती दापोली , आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम , प्रांत अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांनी घेतली आहे.

दाभोळ कन्या शाळेच्या इमारतीची डागडुजी करण्यासाठी उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांनी वर्क ऑर्डर काढली आहे मात्र या वर्क ऑर्डरला दाभोळ ग्रामपंचायतने हरकत घेतली आहे. यानंतर दाभोळ ग्रामपंचायतने एक प्रसिद्धी पत्रक जारी केलंय.

विषय :- जि.प.कन्या शाळा दाभोळ शाळा इमारतीच्या नवीन बांधकामास / दुरुस्तीस ग्रामस्थांचा तसेच ग्रामपंचायतीचा विरोध असल्याबाबत.

वरील विषयान्वये आपणास कळविणेत येते की, जि.प. कन्या शाळा दाभोळ शाळा इमारतीच्या खालील जमिन ग्रामपंचायत दाभोळच्या मालकीची असून सदर इमारत पूर्णतः नादुरुस्त झालेमुळे तसेच सदर शाळेतील विद्यार्थी पटसंख्या ३७ (सदतीस) इतकी असल्यामुळे जि.प.मराठी शाळा दाभोळ नं.१ येथे त्यांची पर्यायी सोय करणेत आलेली आहे.

तसेच जि.प. मराठी शाळा दाभोळ नं.१ व जि.प.कन्या शाळा दाभोळ या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना जि.प.मराठी शाळा दाभोळ नं.१ शाळा इमारतीमध्ये एकत्रित बसविणेबाबतचा प्रस्तावही मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रवागिरी यांचेकडे मंजुरीसाठी सादर करणेत आलेला आहे.

जि.प.कन्या शाळा दाभोळ शाळा इमारतीच्या नविन बांधकामास / दुरुस्तीस ग्रामस्थांचा तसेच ग्रामपंचायत दाभोळचा विरोध आहे. तसा ठराव ग्रामसभेत व मासिक सभेत करणेत आलेला आहे. त्याची प्रत सोबत जोडली आहे.

जि.प. बांधकाम उपविभान दापोली तरी जि.प.कन्या शाळा दाभोळ शाळा इमारतीच्या नवीन बांधकामास / दुरुस्तीसाठी गत्याही खात्याकडून तसेच योजनेतून निधी उपलब्ध झाले तरी त्याचे आपणाकडून अंदाजपत्रक तयार करणेत येवू नये, ही विनंती.

या प्रसिद्धी पत्रकात जि.प.कन्या शाळा दाभोळ शाळा इमारतीच्या नवीन बांधकामास आणि दुरुस्तीस ग्रामस्थांचा तसेच ग्रामपंचायतीचा विरोध असल्याचं म्हटलं आहे. या पत्रकात मासिक सभेची प्रतही जोडण्यात आली आहे. हा ठराव २८ ऑगस्ट २०२३ ला झाला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *