गावातील सामाजिक बांधिलकी लक्षात घेत डॉ वैभव राजन दळी, श्री साई मेडिकल दाभोळ आणि डॉ दळी रिजूवनेट क्लिनिक शृंगारतळी यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय मोहीम राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.
2 महिने मच्छिमारी बंद असल्यामुळे दाभोळ अणि धोपावे परिसरातील मच्छिमारांना धनुर्वात लस ( टी टी इंजेक्शन) मोफत देण्याचे नियोजन केलं होतं.
मच्छिमारांना पावसाळ्यात थोडा वेळ असतो पावसातील दोन महिने संपले की कामावर हजर राहावे लागते त्यामध्ये जोखमीचे काम आणि या कामामध्ये इजा होण्याची किंवा लोखंडी गंजलेल्या वस्तू पासून दुखापत होण्याची शक्यता असते.
हा धोका टाळण्यासाठी ( टी टी इंजेक्शन) मोफत देण्याचे नियोजन करण्यात आलं होतं. धोपावे गावातील सरपंच आशिर्वाद पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली 150 लोकांना मोफत लसीकरण करण्यात आलं असून
दाभोळ येथील योगेश सुर्वे अणि समीर शेटे यांच्या सहकार्याने 70 लोकांना मोफत लसीकरण करण्यात आलं. या सामजिक कार्यामुळे सर्वच स्तरातून डॉ दळी अणि सर्व टीमचं कौतुक होत आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*