चिपळूण : आता महापुराची माहिती मिळणार एका ‘क्लिक’वर

banner 468x60

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून (National Disaster Management Department)चिपळुणातील नागरिकांना महापुराच्या संदर्भातील माहितीचे संदेश मोबाईलवर पाठवण्यास सुरवात झाली आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909


त्यामुळे चिपळुणात पूर कधी येणार, शहरात पाणी कधी भरणार याची माहिती आता मेसेजव्दारे उपलब्ध होऊ लागली आहे. बुधवारी शहरात पाणी भरल्यानंतर शहरातील हजारो नागरिकांना सतर्क राहण्याचे मॅसेज मोबाईलवर आले.

महापुराच्या काळात शहरातील अनेकांना सकाळी ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान मॅसेज येत आहेत. मॅसेज येताना मोबाइल अचानक व्हायब्रेट होऊन मोठ्याने वाजू लागतो.

मोबाइलमधून नेहमीच्या रिंगटोनपेक्षा वेगळा आणि मोठा आवाज येतो. चिपळुणात (Chiplun Flood) पाणी भरले त्या दिवशीही अशाप्रकारचा संदेश तालुक्यातील शेकडो ग्राहकांना आला होता.

त्यावेळी हा नेमका आवाज कशाचा काही समजेना. आपला मोबाइल हॅक झाला की काय की त्यातील डाटा चोरीला गेला, या भीतीने नागरिक चिंताग्रस्त झाले होते. अचानक आलेल्या मेसेजमुळे मोबाइलधारकांचे धाबे दणाणले होते.

याबाबत प्रत्येकजण एकमेकांकडे या मॅसेजचा स्क्रीनशॉट काढून चौकशी करू लागले आणि काही वेळातच सोशल मीडियावर याविषयीची माहिती व्हायरल होण्यास सुरवात झाली. चिपळूण शहरातील शेकडो मोबाइलवर अचानक आलेल्या या मेसेजबाबत चिंता करण्यासारखे काही नसल्याचे समोर येताच अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

चिपळूणमध्ये बुधवार आणि गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. काही ठिकाणी पूरस्थितीचाही धोका होता. या पार्श्वभूमीवर चिपळुणातील प्रत्येक मोबाईल युजरला मराठी, इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये आपत्कालीन मॅसेज आला होता.

केंद्र अथवा राज्य सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग अशा स्वरूपाची सेवा देत आहे, अशी माहिती चिपळूणमध्ये बचावकार्यासाठी आलेले येथील एनडीआरएफच्या तुकडीचे प्रमुख अशोक कुमार यांनी स्पष्ट केले.

भूकंप, मुसळधार पाऊस, पूरस्थिती तसेच इतर आपत्तीकाळात सूचना देण्यासाठी चाचणी सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पोर्टलवर याविषयी अधिक तपशील देणारी माहिती मिळेल.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *