रत्नागिरी : संशयित टँकर जप्त, RDX असल्याचा मुंबई कंट्रोल रुमला आला होता फोन

banner 468x60

जिल्ह्यातून एक संशयास्पद टँकर जप्त करण्यात आला आहे. स्फोटक आरडीएक्स टँकरमधून गोव्यात नेत असल्याची फोन मुंबई कंट्रोल रुमला आला होता.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

त्यातनंतर पोविसांनी रायगड तसेच रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधून तातडीने नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. सर्च ऑपरेशन दरम्यान रत्नागिरी पोलिसांनी एक संशयित टँकर जप्त केला आहे.

टँकर चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक फोन आला होता. RDX घेऊन एक टँकर गोव्याकडे निघालाय.

तसेच या RDX आणि दोन पाकिस्तानी नागरिक देखील या टँकरमधून गोव्याच्या दिशेने जात असल्याने या वक्तीने सांगितले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव पांडे असल्याचं सांगितलं जात आहे. RDX घेऊन एक टँकर गोव्याच्या दिशेने जात असल्याचा फोन पांडे याने मुंबई कंट्रोलरुमकडे केला होता.

यानंतर एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली सुरु केल्या. गोवा पोलिसही अलर्ट मोडवर आले. फोन कॉल नंतर मुंबई पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधत सतर्कतेचा इशारा दिला.

नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एक टँकर ताब्यात घेतला. या टँकरमध्ये केमिकल भरले आहे. टँकर ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपासासाठी तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. टँकरमध्ये स्फोटक आरडीएक्स ठेवले होते की नाही, याचा तपास पोलिस करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *