कोकण रेल्वे मार्गावर 11 आणि 12 जुलैला मेगाब्लॉक

banner 468x60

कोकण रेल्वे मार्गावर 11 आणि 12 जुलैला मेगाब्लॉक (Kokan Railway Megablock) घेण्यात येणार आहे, एकूण सहा गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. संगमेश्वर ते भोके दरम्यान 11 जुलैला, तर कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या देखभालीच्या कामांसाठी 12 जुलैला मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

संगमेश्वर ते भोके दरम्यान 11 जुलैला सकाळी 7.30 ते 10.30 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या तीन तासांच्या मेगाब्लॉकमुळे तिरुनेलवेली-जामनगर (11577) ही 10 जुलै रोजी प्रवास सुरू करणारी एक्स्प्रेस गाडी ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 2 तास 30 मिनिटं थांबवून ठेवली जाणार आहे.

तर 10 जुलै रोजी प्रवास सुरू होणारी तिरुअनंतरपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एकस्प्रेस (16346) कर्नाटकातील ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 1 तास थांबवून ठेवली जाणार आहे.

सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम- कुडाळ ते वेर्णा दरम्यान 12 जुलैला सायंकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या तीन तासांच्या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या चार गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबई सीएसएमटी-मडगाव (12051) ही 12 जुलै रोजी प्रवास सुरु होणारी जनशताब्दी एक्स्प्रेस गोव्यातील थिवीम स्थानकावर तीन तास थांबवली जाणार आहे.

हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम (12618) ही 11 जुलैला प्रवास सुरू होणारी मंगला एक्स्प्रेस रोहा ते कुडाळ दरम्यान अडीच तास रोखून ठेवली जाणार आहे. याचबरोबर दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस (10105) ही 12 जुलै रोजी सुटणारी गाडी रोहा ते कणकवली दरम्यान 50 मिनिटं थांबवली जाणार आहे, तर तिरुअनंतरपुरम सेंट्रल-हजरत निजामुद्दीन (22653) ही गाडी ठोकुर ते वेर्णा दरम्यान 2 तास 50 मिनिटं रोखून ठेवली जाणार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *