रत्नागिरी : वर्षा ढेकणे यांना जिल्हास्तरीय आदर्श समाजसेविका पुरस्कार

वर्षा ढेकणे यांना जिल्हास्तरीय आदर्श समाजसेविका पुरस्कार

banner 468x60

वर्षा ढेकणे यांना जिल्हास्तरीय आदर्श समाजसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

banner 728x90

कोकणचा सन्मान सामाजिक संस्था रत्नागिरी आणि प्रकट महाराष्ट्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाजसेविका वर्षा परशुराम ढेकणे यांचा नुकताच जिल्हास्तरीय आदर्श समाजसेविका पुरस्काराने गौरव करण्यात आला.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्षा ढेकणे यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय महिला रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये विशेष करून महिला बचत गट तसेच महिला सक्षमीकरण यावर त्यांचा विशेष भर असतो. त्यांच्या विविध समाज उपयोगी कार्याबद्दल त्यांना २०२४ चा जिल्हास्तरीय आदर्श समज सेविका पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *