रत्नागिरी : सोहेब सोलकर, आकिब काझी दोघांना अटक, अमली पदार्थ विरोधात रत्नागिरी पोलिसांची आणखी एक धडक कारवाई

banner 468x60

अमली पदार्थ विरोधात रत्नागिरी पोलिसांची आणखी एक कारवाई केली आहे.रत्नागिरी शहरातील नाईक हायस्कुलकडे जाणाऱ्या रस्त्यावर अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या तीन पैकी दोघांना शहर पोलिसांनी अटक केली.

banner 728x90

ही कारवाई गुरुवार 4 जुलै रोजी सायंकाळी 7.55 वा. करण्यात आली.त्यांच्याकडून 16 हजार 800 रुपये किंमतीचा टर्की (ब्राउन हेरॉईन सद़ृश्य) अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आला आहे. सोहेब शकील सोलकर (30,रा.राजीवडा,रत्नागिरी), आकिब काझी (रा.गवळीवाडा,रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

तर फैसल मकसूद (रा.कर्ला,रत्नागिरी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार प्रशांत प्रभाकर बोरकर यांनी तक्रार दिली आहे. गुरुवार 4 जुलै रोजी प्रशांत बोरकर हे पोलिस स्टॉफसह पेट्रोलिंग करत होते.

त्यावेळी सायंकाळी 7.55 वा. सुमारास नाईक हायस्कुलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोहेब सोलकर याच्याकडे 16 हजार 800 रुपयांचा 5 ग्रॅम वजनाचा टर्की हा अमली पदार्थ सापडला आहे. तर आकिब काझी करवी त्याने तो विक्रीसाठी आणला होता अशी माहिती आहे.

फैसल मकसूदनेही त्यांना या गुन्ह्यात मदत केल्याने त्याच्याविरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात 16 हजार 800 रुपयांचा अमली पदार्थ, रोख 5 हजार 800 रुपये आणि 5 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 27 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *