कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी

banner 468x60


कोकणात अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत.

कोकणात (Konkan Rain) आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट (Red Alert) तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्याने अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत.

रत्नागिरीत तर 205 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उद्या देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


कोकणात अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत. रायगडच्या समुद्राला उधाण आले आहे. दुपारनंतर समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होताच.

काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर समुद्र आणखी खवळेल असा अंदाजही हवानाम खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान, मच्छीमारांना अजिबात समुद्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.


मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांचा वेग 50-60 किमी प्रति तास राहण्याचा अंदाज आहे.

उद्या देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत आज अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.50-60 किमी प्रति तासाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *