महाड : रस्त्यावर पाण्याचे लोट प्रवाशांना 10 किमीचा वळसा

banner 468x60

महाड-रायगड या अत्यंत महत्वाच्या आणि ऐतिहासिक अशा मार्गावर लाडवली गावाजवळच्या रस्त्यावर बुधवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर पाणी भरले.

banner 728x90

हा केवळ आणि केवळ ठेकेदाराचा हलगर्जीपणाच नडला असल्याच्या अनेक संतप्त प्रतिक्रिया बुधवारी सायंकाळी नव्याने होत असलेल्या लाडवली पूलाजवळ ऐकायला मिळाल्या.

महाड-रायगड या रस्त्याच्या रूंदीकरणाचे त्याचबरोबर लाडवली गावाजवळच्या नवीन पूलाचे काम गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून त्याचा फटका आणि प्रचंड असा त्रास महाडच्या रायगड विभागातील नागरिकांना विशेषत: वाहन चालकांना कमालीचा सहन करावा लागत आहे.


बुधवारी दिवसभर कोसळत असलेल्या पावसाने सायंकाळी लाडवली नदी तुडूंब भरून वाहू लागली. दरम्यान लाडवली येथील नदीवर नवीन पूलाचे काम सुरू असल्याने रायगड विभागातील नागरिकांना येण्याजाण्यासाठी पूलाच्या बाजूनेच तात्पुरता भराव घालून पर्यायी रस्ता बनविण्यात आला आहे.

दरम्यान बुधवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे तात्पुत्या बनवलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.विशेषकरून नागरिकांना,वाहन चालकांना लाडवली येथे रोडवर पाणी भरल्याने मोहोप्रे, आचळोली, तेटघर, नाते असा आठ ते दहा किमीचा खडतर प्रवास करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मोहोप्रे, आचळोली, तेटघर,नाते हा जर का पर्यायी रस्ता नसता तर बुधवारी रायगड विभागातील हजारो नागरिकांना माघारी फिरून महाड मध्येच मुक्काम करावा लागला असता.

लाडवली येथील नदीने धोक्याची पातळी ओलांडून ठेकेदाराने पूल बांधत असताना, नागरिकांसाठी पर्यायी मार्ग म्हणून केलेला रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी भरले होते, या पाण्यातून वाट काढणं धोक्याचं होतं. एकीकडे नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होती, तर दुसरीकडे धो धो पाऊस पडत होता.

एकंदरीत भयानक परिस्थिती लक्षात घेता, सायंकाळी कामावरून सुटलेल्या रायगड विभागातील लोकांनी महाड तालुक्यातील मोहोप्रे, आचळोली, तेटघर,नाते मार्गे कसंबसं आपलं गाव गाठलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *