चिपळूण : जूनमध्येच ‘डीबीजे ‘ कॉलेजला राष्ट्रीय महामार्गाची नोटीस तरीही कॉलेज प्रशासनाचं दुर्लक्ष

banner 468x60

चिपळूणमध्ये DBJ कॉलेजची संरक्षक भिंत कोसळून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. कॉलेजच्या दुर्लक्षामुळे एका तरुणाचा जीव गेलाय. विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या सिद्धांत प्रदीप घाणेकर वय 19, मूळ गाव देहगाव दापोली असे मृत्यू झालेल्या विद्यार्थाचे नाव आहे.

मात्र या सर्व प्रकरणात आपली यंत्रणा किती कुचकामी आहे हे समजतं यंत्रणा सुधारण्यासाठी कोणाला तरी मरावं लागतं अशी घटना चिपळूणमध्ये घडलीय.

याच प्रकरणात धक्कादायक बाब समोर आलीय ती म्हणजे डीबीजे महाविद्यालय परिसरातील पावसाचे पाणी थेट राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याची नोटीस २९ जूनला राष्ट्रीय महामार्ग विभागाने डीबीजे महाविद्यालय प्रशासनास दिली होती,

मात्र त्याबाबत पुरेशी कार्यवाही डीबीजे कॉलेजने लक्ष न दिल्याने ही संरक्षक भिंत कोसळली आणि त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा जीव गेलाय. मैदानावरील पाणी महामार्गालगत असलेल्या गटार अथवा मोरीत सोडण्याची नोटीस महामार्गाने आधीच दिली होती.


चौपदरीकरणात महामार्गालगत असलेल्या डीबीजे महाविद्यालयाच्या मैदानास काँक्रिटची सरंक्षक भिंत उभारण्यात आली होती. या काँक्रिटच्या भिंतीवर जांभ्या दगडाने संरक्षक भिंत उभारण्यात आली होती जी आता कोसळली आहे. पावसाळ्यात महाविद्यालय परिसरातील पाणी या भिंतीवरून राष्ट्रीय महामार्गावर येत होते.


परिणामी, महामार्गावर पाणी साचत असल्याने नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तक्रारीही केल्या होत्या. त्या आधारे राष्ट्रीय महामार्ग विभागाने डीबीजे महाविद्यालयास २९ जूनला नोटीस बजावली होती. महाविद्यालय परिसरातून महामार्गावर येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या;

मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे भरपावसात शुक्रवारी जांभ्याचे बांधकाम असलेला संरक्षक भिंतीचा कठडा कोसळला आणि यामध्ये या विद्यार्थ्याचा जीव गेला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी आता होऊ लागलीय दरम्यान डीबीजे कॉलेजवर काय कारवाई होणार हे देखील पाहावं लागणार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *