Breaking News

गुहागर : ‘कहो दिलसे नातू फिरसे’ गुहागरातून डॉ. विनय नातूच लढणार, भास्कर जाधव विरुद्ध विनय नातू

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीचा बालेकिल्ला असणारा गुहागर विधानसभा मतदार संघ हा महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. विनय नातू हेच पुन्हा लढवणार आहेत.

banner 728x90 banner 728x90

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे पालक सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वीच हा विधानसभा मतदार संघ महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी लढवणार असून डॉ. विनय नातू हेच या विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करणार असल्याचे जाहीर केले आहे, अशी प्रतिक्रिया गुहागर तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी दिली.

या विधानसभा मतदार संघात गुहागर तालुक्यातील १४० बूथ, चिपळूण तालुक्यातील ९२ आणि खेड तालुक्यातील ९० बूथचा समावेश होतो.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांना या मतदार संघातून पडलेली कमी मते याबाबतचे चिंतन करण्यासाठी तिन्ही तालुक्यांमध्ये भाजपच्या बैठका झाल्या.

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुहागर तालुक्यामध्ये झालेल्या मेळाव्यात कहो दिलसे नातू फिरसे, हा नारा देऊन डॉ. नातू यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *