कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांना दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेचा 2026 पुरस्कार जाहीर, पद्मश्री दादा इदाते यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन

banner 468x60

दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेने २०२६ साली पत्रकारितेत समाजहित, विकास आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी पुरस्कार जाहीर केला आहे. यंदा हा विशेष पुरस्कार कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांना देण्यात येणार आहे. हा सन्मानसोहळा ६ जानेवारी २०२६ रोजी, रामराजे महाविद्यालय, दापोली येथे पद्मश्री दादा इदाते यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

banner 728x90 banner 728x90

कार्यक्रम पत्रकार दिनाच्या औचित्याने आयोजित केला गेला असून, या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

तेजस बोरघरे हे कोकणातील पत्रकारितेत निष्पक्ष भूमिकेसाठी आणि प्रभावी लेखणीसाठी ओळखले जातात. गेल्या दोन वर्षांपासून ते कोकण कट्टा न्यूजचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून त्यांनी कोकणातील तळागाळातील समस्या, ग्रामीण भागातील मूलभूत गरजा, स्थानिक प्रशासनातील त्रुटी आणि सामाजिक प्रश्न यावर लक्ष वेधले आहे.

त्यांच्या पत्रकारितेचा विशेष गुण म्हणजे ग्रामीण भागातील लोकांच्या बाजूने आवाज उठवणे, प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देणे आणि समाजातील गंभीर समस्या जनसामान्यांसमोर आणणे. त्यांच्या माध्यमातून प्रकाशित अनेक सामाजिक बातम्यांचा ठोस परिणाम झाल्याचेही दिसून आले आहे.

तेजस बोरघरे यांचे काम फक्त बातम्या देण्यापुरते मर्यादित नाही; ते सामाजिक भूमिका घेतात, भूमिपुत्रांसाठी आवाज उठवतात आणि कोकणातील सर्वसामान्यांचे प्रश्न मुख्य प्रवाहात आणतात. गेल्या आठ वर्षांमध्ये तेजस बोरघरे यांनी महाराष्ट्रातील अनेक प्रमुख माध्यमसंस्थांमध्ये कार्य करताना स्वतःचे वेगळेपण जपले आहे.

त्यांनी लोकसत्ता, मॅक्स महाराष्ट्र, लोकशाही, जय महाराष्ट्र या प्रतिष्ठित न्यूज नेटवर्कमध्ये काम केल्यानंतर सध्या ते पुढारी न्यूजमध्येही कार्यरत आहेत.

निवड समिती आणि सन्मान सोहळा

पुरस्कार निवड समितीत प्रसाद रानडे, प्रशांत परांजपे, प्रशांत कांबळे आणि रूपेश वाईकर यांचा समावेश होता.

पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रामराजे महाविद्यालयाचे संस्थापक संदीप राजपुरे, दापोली नगराध्यक्षा कृपा घाग, जालगावचे सरपंच उद्योजक अक्षय फाटक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा व नगरसेविका साधना बोत्रे, दशानामे गुजर युवक संघटना आणि जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर यांनी सर्व पत्रकार, नागरिक आणि समाजातील प्रतिनिधींना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *