दापोली : 2023 पासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग ते लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य, सुनील शिंदेवर गुन्हा दाखल

banner 468x60

एकीकडे सिया म्हाब्दी हे प्रकरण ताजं असताना सुसंस्कृत दापोलीत घडतंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय. दापोलीत अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुनील शिंदे अश्या लोकांना आपल्या वयाचा ही भान राहिला नाही का असा सवाल आता दापोलीकर उपस्थित करत आहे.

हे ही पाहा :

सुनील यशवंत शिंदे राहणार दापोली वय 35 आणि अल्पवयीन मुलगी हिला गेल्या एका वर्षापासून होत असलेला त्रास. प्रकरणाची भांडफोड आता झाली असली तरी अश्या प्रकारात मुली गप्प का बसतात हा देखील संशोधनाचा विषय आहे.

हे ही वाचा :

दापोली तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत अश्लील चाळे केल्याप्रकरणी सुनील यशवंत शिंदे याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. भादंवि 354,354 (ड), 506 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार कलम 8, 12 गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सुनिल शिंदे हा गेल्या 20 ऑगस्ट 2023 पासून पीडित मुलीला त्रास देत असल्याची माहिती आहे. कधी कधी मुलीचा पाठलाग करणे, मनाला लज्जा उत्पन्न होईल असं वागणं आणि त्रास अल्पवयीन मुलीला देण्यात आलाय.

सुनिल शिंदे यांनी या प्रकाराबद्दल घरी कोणाला सांगितले तर तुला, वडिलांना ठार मारण्याची धमकी देखिल दिली होती. यामुळे पीडित मुलगी हा सर्व प्रकार घरी सांगण्यास घाबरत होती. 2023 पासून तिने याबाबत घरी कोणाला काहीही सांगितलेले नाही.

मात्र 2024 च्या 15 जून नंतर पुन्हा सुनील शिंदे या मुलीला दिसल्याने तो परत आपल्याला त्रास देईल या भीतीने मुलगी आजारी पडली. तिला दवाखान्यात अतिदक्षता विभागात भरती देखिल करण्यात आलं होतं. यानंतर मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर जेव्हा घरीआल्यानंतर घरच्यांनी विचारणा केली असता 20 ऑगस्ट 23 ते जून 24 पर्यंत घडलेला सगळा प्रकार तिने घरच्यांना सांगितला.

यानंतर मात्र घरच्यांनी धीर धरुन हा सर्व प्रकार दापोली पोलिसांना सांगितला. दापोली पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत सुनिल शिंदे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली.

सुनील शिंदे याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सुनिल शिंदेला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय . दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *