चिपळूण : डेरवणजवळ कापशी नदीत बुडून शाळकरी मुलीचा मृत्यू

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील कापशी नदीत बुडून शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता घडली.

याबाबत सावर्डे येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रावणी सुधीर मोहिते (15 वर्षे, रा.डेरवण, खालची बौध्दवाडी, चिपळुण, मुळ रा. कळंबस्ते, संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.

श्रावणी सुधीर मोहिते ही डेरवण खालची बौध्दवाडी येथून जात असताना नदी किनार्‍यावरुन चालताना गवतावरून तिचा पाय घसरला आणि ती थेट कापशी नदीच्या प्रवाहात पडून वाहून गेली.

त्यानंतर तिचा शोध घेतला असता ती कापशी नदी पात्रात डेरवण खुर्द मठाजवळ मृतावस्थेत आढळून आली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *