दापोली : संजय कदमांचा योगेश कदमांना धक्का, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

banner 468x60

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निवडणूकीच्या तोंडावर दापोलीत शिंदे गटाला धक्का बसलाय. शिरखल दगडवणे येथील शिंदे गटाच्या कार्यकत्यांनी ठाकरे गटात घरवापसी केली आहे.

दापोलीत लोकसभा निवडणूकीपूर्वीच झालेल्या या राजकिय उलथा पालथीमुळे निवडणुकीतील मताधिक्यांची सारी गणिते बदलणार आहेत.

दापोलीत माजी आम. संजय कदम हे आपल्या सक्षम नेतृत्वाचे कसब पणाला लावून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे अगदी पडत्या काळातही चांगलेच प्राबल्य वाढवत आहेत.

दापोली विधानसभा मतदार संघात होणारे पक्ष प्रवेश ही बाब शिवसैनिकांना ऊर्जा मिळवून देणारी ठरत आहे. संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष संघटनेचे काम करण्यासाठी

राकेश सकपाळ (मुंबई मंडळ अध्यक्ष) संतोष जाधव (मुंबई मंडळ सचिव) विजय सालेकर (मुंबई मंडळ खजिनदार), अनंत सकपाळ, बालकृष्ण दाभेकर, सहदेव बामणे, धोंडू चव्हाण, विजय बामणे, जनार्दन सकपाळ, सुनिल जाधव, विजय सालेकर, रणजित जाधव, सुधिर जाधव, संतोष बामणे, संदिप जाधव, प्रणय दाभेकर, महेष बामणे, सचिन सकपाळ, श्रीकांत जाधव, सुर्यकांत चव्हाण, दिपक बामणे, जयवंती सकपाळ, मिनाक्षी जाधव, वनिता सालेकर, शैला सालेकर, पल्लवी सालेकर, करूणा सकपाळ, शुभांगी बामणे, शेवंती दाभेकर, संजना सालेकर, पुष्पा सकपाळ, शेवंती सकपाळ, शोभना सुर्वे, दिलीप सुर्वे आदीं शिरखल दगडवणेतील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

उध्दव ठाकरे यांनी त्यांच्यावर दापोली विधानसभा मतदार संघाची टाकलेली जबादारी पार पाडण्यासाठी एक शिवसैनिक म्हणून आपलाही यात सहभाग असावा या हेतुने संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष संघटनेचे काम करून शिवसेना संघटन अधिक भक्कम करण्यासाठी आपण शिवसेनेत घरवापसी करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी एकमुखाने सांगितले.

यावेळी शिवसेना नेते अनंत गिते, जिल्हा प्रमुख सचिन जाधव, माजी आम. संजय कदम, सहसंपर्क प्रमुख प्रविण लाड, तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालूका सचिव नरेंद्र करमरकर, जि.प. माजी बाधकाम सभापती विश्वास कदम, विभाग प्रमुख विलास कलमकर विष्णू कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *