रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा 2024 : कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांची उद्या पत्रकार परिषद

कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांची उद्या पत्रकार परिषद

banner 468x60

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा मतदार संघात सर्वच पक्षाकडून जोरात प्रचार सुरू आहे.

महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे राहील की शिवसेना शिंदे गटाकडे जाईल, हा तिढा अखेर सुटला आहे. त्यामुळे कोकणात आता तिहेरी लढत होणार आहे.

ठाकरे गटाकडून विनायक राऊत, कोकण प्रादेशिक पक्षाकडून शकील सावंत तर भाजपकडून नारायण राणे यांच्यात लढत होणार आहे.

शकील सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे.

त्यामुळे विविध मुद्यांवर बोलण्यासाठी शकील सावंत यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. दिनांक 23 एप्रिल, 2024. वेळ – सकाळी 11 वाजता, ठिकाण , हॉटेल सावंत पॅलेस, बॅक्वेट हॉल येथे या पत्रकार परिषद होणार आहे.

प्रश्न तुमचे… उत्तर कोकणच्या विकासाचे असं म्हणत कोकणच्या विकासाठी मी लोकसभेची निवडणूक लढवत असल्याचं शकील सावंत यांनी म्हंटलं.

त्यामुळे या पत्रकार परिषदेत शकील सावंत काय बोलणार याची उत्सुकता आहे.

दिनांक : २३ एप्रिल, २०२४
वेळ : सकाळी ११ वाजता
ठिकाण : हॉटेल सावंत पॅलेस, बॅक्वेट हॉल, टीआरपी स्टॉप, रत्नागिरी.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *