रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा – नारायण राणे ठरले सर्वांत श्रीमंत उमेदवार, ‘इतक्या’ कोटींची आहे संपत्ती

banner 468x60

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे सर्वांत मोठे श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत:सह पत्नी नीलम राणे (Neelam Rane) आणि कुटुंबाची मिळून सुमारे १३७ कोटींहून अधिक मालमत्ता जाहीर केली आहे.

त्यांची वैयक्तिक मालमत्ता सुमारे ३५ कोटींची आहे. त्यांच्यासह पत्नी व कुटुंबीयांवर सुमारे २८ कोटींहून अधिकचे कर्जही असल्याचे नमूद केले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदार संघात महायुतीकडून भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात आहे. १९ एप्रिलला त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यामध्ये त्यांनी प्रतिज्ञापत्रावर आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी स्वत:चे वार्षिक उत्पन्न मागील आर्थिक वर्षात ४९ लाख ५३ हजार आहे.

पत्नीचे वार्षिक उत्पन्न ८७ लाख ७३ हजार ८८३ असून, कौटुंबिक उत्पन्न १५ लाख ७ हजार ३८० आहे. राणे यांच्याकडे १ कोटी ७६ लाख ९६ हजार ५३६ रुपयांचे २५५२.२५ ग्रॅम सोने तर ७८ लाख ८५ हजार ३७१ रुपयांचे डायमंड आहेत. सौ. नीलम राणे यांच्याकडे १ कोटी ३१ लाख १७ हजार ८६७ रुपयांचे १८१९.९० ग्रॅम वजनाचे सोने आहे. १५ लाख ३८ हजार ५७२ रुपयांचे डायमंड आणि ९ लाख ३१ हजार २०० रुपयांची चांदी आहे.

सोने, चांदी व डायमंड असे कुटुंबाकडे ९ कोटी ३१ लाख ६६ हजार ६३१ रुपयांचा किमती ऐवज आहे. केंद्रीय मंत्री राणे यांच्याकडे पनवेल, वेंगुर्ला, कुडाळ, कणवकवलीतील जानवली येथे जमीन आणि कणकवलीत बंगला, अशी ८ कोटी ४१ लाख ४५ हजार ३३७ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

निलम राणे यांच्याकडे पनवेल, कणकवलीत जानवली, मालवण, पनवेल कर्नाळा, कुडाळ, मालवणमध्ये गाळे, पुणे येथे ऑफिस, मुंबईत फ्लॅट अशी सुमारे ४१ कोटी १ लाख ८२ हजार ७६५ रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. नारायण राणे यांच्या नावावर विविध बँकांमध्ये १२ कोटीची बँक डिपॉझिट तर नीलम राणे यांच्या नावावर सव्वा २ कोटींची बँक डिपॉझिट आहेत.

राणे यांच्याकडे ५५ लाखांचा बँक बॅलन्स असून ७२ हजारची रोकड आहे. सौ. राणे यांच्याकडेही ७२ हजारांची रोकड असल्याचे नमूद केले आहे.

नारायण राणे यांच्या नावावर इनोव्हा, मर्सिडिज बेंज, मारुती इर्टिगा तर नीलम राणे यांच्या नावावर दोन स्कोडा, इको गाडी आणि कुटुंबीयांच्या नावावर मर्सिडिज बेंज या गाड्या आहेत. विविध कंपन्यांमध्येही त्यांचे शेअर्स व पार्टनरशिप आहे. त्याचे मूल्य सुमारे ६३ कोटी रुपये आहे.

नारायण राणे यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे ३५ कोटी आहे. तर नीलम राणे यांच्याकडे ७५ कोटींची संपत्ती आहे. कौटुंबिक संपत्ती २७ कोटी रुपयांची आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ते सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *