शिमगोत्सव, ज्याला होळी असेही म्हटले जाते, हा सण विविध रंगांचा, आनंदाचा व कुटुंब आणि आपल्या परिजनांसोबत आनंदी क्षण घालवण्याचा एक उत्सव आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही वर्षांपासून अनेक गावांमध्ये शिमगोत्सव-पालखी वरून विविध गटांमद्धे वाद-विवाद होते.
या वादांच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक, . धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक. जयश्री गायकवाड, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी जिल्हा व प्रभारी पोलीस
अधिकारी, सर्व पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड मधील 4, गुहागर मधील 2, संगमेश्वर मधील 2, राजापूर मधील 3, नाटे मधील 3, देवरुख मधील 3, लांजा मधील 4 व चिपळूण मधील 3 गावातील ग्रामस्थांची पोलीस ठाणे येथे व
गावामध्ये वारंवार बैठका घेऊन व सुसंवाद साधून रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 34 पैकी 28 गावामधील पूर्वापार चालत आलेला वाद-विवाद सामोपचाराने मिटविण्यात रत्नागिरी पोलीस दलाला यश आले आहे.
तसेच एकूण 6 गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम 144 प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत.
शिमगोत्सव सामंजस्याने आणि सद्भावनेने केला जाईल, काळजी घेतली जाईल व उत्सवादरम्यान संपूर्ण जिल्ह्यात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता रत्नागिरी पोलीस दल कटिबद्ध आहे व सदैव दक्ष आणि सक्रिय राहतील.
या प्रयत्नांमध्ये, रत्नागिरी जिल्हा पोलीस दल ह्यांचे त्या त्या गावचे पोलीस पाटील, शांतता समिति सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, तंटामुक्त समित्या ह्यांचे सहकार्य लाभत आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या हया प्रयत्नांना बळ देणाऱ्या सर्व पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, शिमगोत्सव मंडळे, तंटा मुक्त समित्या ह्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक ह्यांनी आभार मानले आहेत.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*