राज्यातील विविध शहरात सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस Police अलर्ट झाले असून कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर (Sociala Media) प्रसारित करु नये, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे.
रत्नागिरीतील दापोलीत हिंदूंबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टनंतर दापोलीत तणाव निर्माण झाला. पोस्ट करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
त्याचबरोबर पोलिसांकडून दापोलीकरांना खबरदारीच्या सूचना आणि कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात तणावाचे वातावरण असून ठिकठिकाणी आंदोलन (Protest) सुरु असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे.
सामाजिक सलोख्याला बाधा येईल, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील, असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित करु नये.
तसे आढळून आल्यास कठोर कार्यवाही करण्याचा इशारा रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*