रत्नागिरी : उद्भव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांना धमकी

उद्भव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांना धमकी

banner 468x60

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सर्वच पक्षाकडून प्रचार सुरू आहे. कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांनी सध्या मतदार संघात प्रचाराचा धडाका लावलाय.

दरम्यान प्रचार करताना कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांना धमकी देण्यात आलीय. कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला असून ते गावोगावी जाऊन प्रचार करत आहे.

या प्रकारानंतर शकील सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांना भेटून पोलीस संरक्षण मागितलं आहे.

पूर्णगड गावामध्ये प्रचार करत असताना अश्रफ सारंग याने प्रचारादरम्यान आम्हाला अडथळा निर्माण केला आणि माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या अंगावर धावून आला असं शकील सावंत यांनी तक्रार अर्जात म्हटलंय.

शकील सावंत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय प्रचाराचे वेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिरताना दि. ०९/०४/२०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजताचे सुमारास पूर्णगड गावामध्ये अश्रफ सारंग या नावाचा व्यक्ती प्रचारादरम्यान आम्हाला अडथळा निर्माण केला व माझ्या आणि माझ्या सहकार्यांच्या अंगी आला.

“सुवर्ण भास्कर” या व्हॉटस्अॅप ग्रुपवरील स्क्रीनशॉटनुसार कर्ला, नवा कर्ला, बांध, आदमपूर, निवखोल, शिवखोल या ठिकाणी नदीम सोलकर (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) यांनी व्हॉटस्अॅप मेसेजच्या द्वारे सांगितले की कोणीही मुस्लिम अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत असला तरी समाज त्याला मतदान करणार नाही.

कारण अपक्ष उमेदवाराला मत म्हणजेच भाजपाला अप्रत्यक्षरित्या फायदा आहे असे समाजाला समजलेले आहे. मुस्लिम मताचे विभाजन करण्यासाठीच ओवेसी पॅटर्न कोकणात राबवला जात आहे, समाज अशा प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी सज्ज आहे.

अशा पद्धतींना धर्माच्या माध्यमातून प्रचार करुन आणि खोटे आरोप लावून माझ्या विरोधात नदीम सोलकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अल्प संख्या तालुका प्रमुख) कटकारस्थान करावयाचे करीत आहेत. लोकसभा निवडणूकीमध्ये धार्मिक रंग देऊन वर नमुद व्यक्ती कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. वर इतरत्र नमुद केल्याप्रमाणे, प्रचार

करताना दि. ०९/०४/२०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजताचे सुमारास पूर्णगड गावामध्ये अश्रफ सारंग ही व्यक्ती माझ्या आणि माझ्या सहकार्यांच्या अंगी आला म्हणून प्रचारादरम्यान

माझ्यावर कुठलाही हल्ला होऊ नये किंवा मला कोणताही त्रास होऊ नये याकरिता मला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी शकील सावंत यांनी केलीय.

दरम्यान जाती धर्मावर आम्ही प्रचार करत नसल्याचं कोकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक ओवेस पेचकर यांनी म्हटलंय.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *