Breaking News
रत्नागिरी : गोखले नाका परिसरात वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड, दापोली व खेड येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतींसाठी शासनाची मंजुरी 30 कोटींच्या निधीस मंजुरी; ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्णय – राज्यमंत्री योगेश कदम दापोली : 7/12 उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)ला रंगेहात अटक, लाच घेण्यात महिला अधिकारीही मागे नाहीत, सततच्या लाच मागणीला कंटाळून तक्रार दाखल रत्नागिरी : पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेची सोन्याची चेन लुटली खेड : पंचायत समिती कार्यालयात हृदयविकाराचा झटका, चिपळूण येथील शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

कोकण : मुबंई-गोवा महामार्गाला “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग” नाव देण्याची कोंकण प्रादेशिक पक्षाची मागणी

मुबंई-गोवा महामार्गाला “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग” नाव देण्याची कोंकण प्रादेशिक पक्षाची मागणी

banner 468x60

मुबंई-गोवा महामार्गाला “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग” नाव देण्याची कोंकण प्रादेशिक पक्षाने मागणी केली आहे.

banner 728x90 banner 728x90

कोंकण प्रादेशिक पक्षाने केलेल्या मागणीला सर्वच स्थरातून पाठिंबा मिळत आहे. कोंकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक संयोजक अ‌ॅड.ओवेस पेचकर यांनी मांडलेल्या संकल्पनेला सामाजिक सघटनांनी समर्थन केलं आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीतून मुंबई-गोवा महामार्गाचा बहुतांशी भाग जात आहे. रायगड ही हिंदवी स्वराज्याची राजधानी याच कोकणात होती.

पुढे चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावी छत्रपतींच्या सैन्याची छावणी होतीसंगमेश्वर- कसबा या कोकणातील भागात छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते. महाराणी येसूबाई यांचे शिर्के घराण्यातील माहेर कोकणातील कुटरे हे गाव सुध्दा कोकणातच आहे.

आपल्या कोकण भूमीतच छत्रपती शिवरायानी स्वराज्याचे आरमार उभे केले होते, याच कोकण भूमीतून हा मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग जात असून आता या रस्त्याचे बरेचसे काम पूर्णत्वास येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि कोकणाचे अतूट नाते असून या भागातून जाणा-या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग’ असे नाव देण्यात यावे, या मागणीला आता मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेचा जाहीर पाठिंबा दिला आहे.


मराठा समाज मुंबई तर्फे या मागणीला जाहीर पाठिंबा देण्यात आला असून यावेळी पक्षाचे संस्थापक – संयोजक अ‌ॅड.ओवेस पेचकर, सचिव अ‌ॅड. शुभम उपाध्याय मराठा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. रमेश र. शिर्के -अध्यक्ष ,. अजय सि. खामकर – सरचिटणीस,

ज्ञानेश्वर ना. भालेराव – कोषाध्यक्ष,ऐश्वर्या र. ब्रीद- सहचिटणीस, दिगंबर द. राणे – सहचिटणीस ,राजन भोसले, ज्येष्ठ नागरिक समन्वय आणि आरोग्य विभाग,माधुरी तळेकर – कार्य. समिती आणि प़मुख महिला आघाडी, मनिषा अ. साळवी निमंत्रक – महिला आघाडी. आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *