माजी खासदार नीलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्यातील राड्याप्रकरणी जाधव यांच्या ११ समर्थकांना खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणी सुमारे ४०० जणांवर चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. अजूनही अनेकांचा शोध पोलिस घेत आहेत.
माजी खासदार नीलेश राणे यांच्या मिरवणुकीवेळी अचानक दगडफेक सुरू झाली. त्या दगडफेकीमध्ये माजी खासदार नीलेश राणे यांच्या ताफ्यातील वाहनांच्या काचा फुटल्या तसेच कार्यकत्यांकडून झालेल्या दगडफेकीमध्ये पोलिस कर्मचारी जखमी झाले.
यामध्ये अटक असलेले संशयित आरोपी शहानवाज आयुब शिरळकर, फैय्याज सत्तार शिरळकर, हेमंत वासुदेव मोरे, संजय किसन भुवड, राम नारायण डिगे, सुनील शंकर तांबडे, संजय चंद्रकांत गोताड, राजेंद्र कृष्णा गायकवाड, दिलीप गणपत साबळे, प्रकाश भिवा जाधव, प्रभाकर पांडुरंग जाधव यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
या संशयितांच्या जामीन अर्जावर २२ फेब्रुवारीला खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सर्वांना सोमवारी सायंकाळी न्यायालयाने जामीन मंजूर केला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














