संगमेश्वर : एसटी बस आणि कारचा अपघात

banner 468x60

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील संगमेश्वर एसटी स्टॅन्ड पासून काही अंतरावर असलेल्या निढले वाडी येथील चिपळूणहून रत्नागिरीकडे एसटी बस चालक विकास कांबळे हे एसटी बस क्रमांक MH09FL1081 घेऊन जात असताना गोवा येथून मुंबई च्या दिशेने MH47BPO556 मारुती फॉरनेक्स गाडी ही चालक हे अमित चावळा हे त्यांची पत्नी आशा चावळा यांच्यासह घेऊन जात असताना दुपारी अडीच च्या सुमारास अपघात झाला.

या अपघातात दोन्ही गाड्यातील कोणीही जखमी झाले नसून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातयामुळे मुबंई च्या दिशेने तसेच गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूकडे मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागून वाहतूक खोलंबली होती.

अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस हेड कॉन्सटेबल शेलार, पॉलीस कॉस्टेबल विश्वास बारगाले यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातात सुदैवाने कोणतीही मनुष्यहिनी झाली नाही.

मात्र दोन्ही गाड्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून 2 तास उलटून गेले तरी एसटी चालक विकास कांबळे यांनी सबंधिताना कल्पना देऊनही एस्टीचे अधिकारी पोहचले नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *